मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले

अंबाजोगाई न्यूज ऑफ द डे

तीन जिल्ह्यांचा पाणी प्रश्न मिटला

केज : मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर रविवारी सकाळी दोन दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला होता. दुपारी पाण्याची आवक वाढल्याने आणखी दोन दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान, आता बीड, लातूरसह उस्मानाबाद जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटला आहे.

रविवारी जवळपास दिवसभर पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्याने आवक आणखी वेगाने वाढल्यानंतर रात्री १०.४५ वा. आणखी दोन दरवाजे उघडण्यात आले. आता एकूण सहा दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले असून त्याद्वारे १४८.४४ घनमीटर प्रति सेकंद वेगाने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Tagged