MURDER

चाकूने भोकसून पुजाऱ्याचा खून

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

शेपवाडी येथील खळबळजनक घटना

अंबाजोगाई : एका माथेफिरूने चाकूने भोकसून पुजाऱ्याचा खून केल्याची घटना शहरालगत असलेल्या शेपवाडी येथे शनिवारी (दि.०२) दुपारी १ वाजता घडली.

संतोष दासोपंत पाठक (वय ५०, रा. रविवार पेठ, धनगर गल्ली अंबाजोगाई) असे मृत पुजाऱ्याचे नाव आहे. ते शेपवाडी येथील हनुमान मंदिराचे पुजारी होते. ते गेल्या अनेक वर्षापासून यांच्याकडे शेपवाडी गावातील सर्व पूजाअर्चा असतात. गुढीपाडवा असल्याने ते सकाळपासून शेपवाडी गावातील हनुमान मंदिरात थांबले होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांच्यावर एका माथेफिरूने चाकूने अनेक वार केले. ग्रामस्थांनी गंभीर जखमी झालेल्या पाठक यांना तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले, परंतु तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Tagged