ATYACHAR

दोघांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

क्राईम न्यूज ऑफ द डे मराठवाडा

पैठण, दि. 7 : पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या थेरगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केल्याची घटना घडली. यासंदर्भात पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोन्ही आरोपी फरार झाले आहेत.

थेरगाव येथील एका अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत शेती वस्तीवर राहते. ही मुलगी घराबाहेर थांबली होती. त्याचवेळी गावातीलच आरोपी जुनेद दस्तगीर पठाण व दीपक आहेर यांनी पीडितेचे तिचे तोंड दाबून तिला शेजारच्या शेतामध्ये घेऊन गेले. तिथेच दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. ही घटना घरच्यांना सांगितली तर तुला मारून टाकू अशी धमकी आरोपींनी दिली. परंतु मुलीने झालेली घटना आपल्या आई-वडिलांना सांगितल्यामुळे पीडित मुलीच्या आईने वडिलांनी पाचोड ठाणे गाठून आरोपी विरोधात तक्रार दिली. त्यानुसार आरोपींवर भादंवि कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात कलम आणखी वाढणार आहेत. आरोपी मात्र फरार आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस अधिक्षक गोरख भाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलीस करीत आहे.

Tagged