uddav thackary

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

मुंबई- महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन नाही पण संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली. ते फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत आहेत. ते म्हणाले बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
पुढे 15 दिवस ती सुरुच राहणार आहे.
काय म्हणाले ठाकरे?

  • बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून पुढचे पंधरा दिवस 144 कलम लागू.
  • कोणालाही योग्य कामाशिवाय अतिआवश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास परवानगी नाही.
  • 15 दिवसांसाठी संचारबंदी
  • अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापना बंद राहतील.
  • बस आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही जिवनावश्यक सेवा देण्यासाठीच चालू राहणार.
  • हॉटेल्स, रेस्टॉरंटवर बंद, होम डिलेव्हरीसाठी परवानगी
  • राज्यातील सर्व पेट्रोलपंप सुरुच राहतील.
  • रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सुध्दा सकाळी सात ते रात्री आठपर्यंत परवानगी
  • पुढील महिनाभर शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा.
  • बांधकाम मजुरांना 1500 रुपये अर्थसहाय्य.
  • नोंदणीकृत घरेलू कामागारांना देखील हा निधी देण्यात येत आहे.
  • अधिकृत फेरीवाल्यांना 1500 रुपये देणार
  • त्यांना बँकेत हा निधी दिला जाईल.
  • परवानाधारक रिक्षा चालकांना 1500 रुपये देण्यात येतील.
  • आदिवासींना प्रतिकुटूंब 2000 रुपये आर्थिक लाभ.
  • कोविड उपाययोजनांसाठी जिल्हाधिकार्‍यांना खर्चाचे अधिकार देत 3300 कोटी रुपये बाजुला काढून ठेवण्यात येत आहेत. त्यांनी गरजेनुसार हा निधी उपयोगात आणावा.
  • राज्यात दररोज 40 ते 50 हजार रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी आहे. पण रुग्णसंख्या अशीच वाढत राहीली तर ही मागणी दुप्पट होणार आहे. हे सगळं मी अत्यंत प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतोय.
  • जगभराचा अनुभव सांगतोय की आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी थोडीशी संधी मध्ये हवी आहे. त्यासाठी ही बंदी टाकण्यात आली आहे.
  • भयानक पध्दतीने राज्यात रुग्णवाढ झालेली आहे. ही भितीदायक परिस्थिती आहे. चाचणीचे रिपोर्ट यायला उशीर लागतोय. कारण त्या यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला आहे. दररोज अडीच लाखाच्या वर चाचण्या केल्या जात आहेत.
  • विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ व्हायला नको म्हणून परीक्षा पुढे ढकलल्या. पण आता आपल्याला कोविडच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचंय.
  • कोविड प्रश्नावर सर्वांची चर्चा करीत होतो. अनेकांची मत मतांतरे आहेत. पण आता चर्चा किती दिवस करायची. वेळ निघून गेली तर परिस्थिती गंभीर होईल.
  • 1200 मेट्रीक टन आपण ऑक्सिजनची निर्मिती करतो. आता पूर्णपणे याचा वापर आरोग्य सुविधेसाठी वापरणार. आजही आपण 1100 ते 1150 मेट्रीक टन लागत आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट आहे.
  • मधल्या काळात रुग्ण कमी झाल्याने कंपन्यांनी रेमडीसीवीर औषधांचे उत्पादन कमी केले होते. आता ते त्यांनी वाढवले आहे. पण आपल्यापर्यंत हे औषध यायला थोडा काळ जाईल.
  • ऑक्सिजन बाहेर राज्यातून आणण्यासाठी आम्हाला परवानगी द्या अशी केंद्राला विनंती केली होती. त्यानुसार पश्चिम बंगालसारख्या राज्यातून आपण ऑक्सिजन आणत आहोत.
  • रस्त्याने ऑक्सिजन आणेपर्यंत खूप उशीर होईल, त्यामुळे हवाई वाहतुकीने आम्हाला ऑक्सिजन पुरवा, अशी माझी केंद्राला विनंती आहे.
  • जीएसटी परतावा मुदत वाढविण्यासाठीही माझी केंद्राला विनंती आहे. उद्योग धंदे आणि रोजी रोटीसाठी ही विनंती मान्य करावी.
  • नैसर्गिक आपत्ती समजून हातावर रोजी रोटी असणार्‍या लोकांना व्यक्तीगत मदत द्यावी, अशी माझी केंद्राला विनंती आहे.
  • कोरोनावर औषध सापडलेले नाही पण लस सापडली आहे. त्यामुळे लसीकरण वाढवावे.
  • लसीकरण केल्यानंतरही तिसरी, चौथी लाट येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. ब्रिटनने 50 टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस दिलाय त्याच मार्गाने आपल्याला देखील जावे लागेल.
  • मागच्यावेळी आपण अशी लाट थोपवलेली होती. मात्र यावेळी अनअपेक्षीत लाट आली. त्यामुळे आरोग्य व्यवस्था तोकडी पडणार आहे. पण म्हणून आपण हातपाय गाळून बसलेलो नाहीत. जिद्दीने सामोरे जाणार आहोत.
  • पुन्हा एकदा आरोग्याच्या सुविधा आपण वाढवत आहोत. ऑक्स्जिन, व्हेंटीलेटर बेड, क्वारंटाईन सेंटर सगळं काही वाढवत आहोत.
  • परंतु प्रत्यक्ष उपचार करण्यासाठी डॉक्टर्स लागणार आहेत. आताच उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांना आपण अवाहन करीत आहोत. निवृत्त झालेले डॉक्टर, परिचारिका यांना देखील अवाहन करीत आहोत. लढण्यासाठी पुढे या. सर्व सेवाभावी संस्थांनी पुढे यावे. ज्याला जे जे शक्य असेल ते ते करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे.
  • राजकीय पक्षांना विनंती आहे की कुणीही राजकीय उणीदुणी काढत बसू नका. हे फार मोठं संकट आहे. आपण याला साथ म्हणत असू तर आपणही एकसाथ या संकटासोबत लढलं पाहीजे.
  • निर्बंध लावताना मला अजिबात आनंद होत नाही. आपण बराचसा वेळ चर्चेत घालवला पण आता वेळ आली आहे.
  • जीव वाचवणे हाच आपल्यासमोरील महत्वाचा मुद्दा आहे.
  • बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून हे निर्बंध लागू होतील.
  • पंढरपूरसाठी मात्र याला अपवाद ठेवावं लागत आहे. या ठिकाणी मतदान झाल्यानंतर हे निर्बंध लागू होतील.

तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ
राज्य सरकारतर्फे अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्रत्येकी तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ मोफत देणार आहोत. सात कोटी नागरिकांना ही सुविधा देण्यात येईल.

काय सुरू असेल?

  • हॉस्पिटलं, डायग्नोस्टिक सेंटर्स, क्लिनिक्स, व्हॅक्सिनेशन, मेडिकल इन्शुरन्स ऑफिस, फार्मसी, फार्मसिटकल कंपन्या, हेल्थ सर्व्हिस, उत्पादन यंत्रणा आणि त्याची वाहतूक करणार्‍या यंत्रणा. दवाखाने, विमा, औषधं, औषधी सेवा डिलर, लस उत्पादन कारखाने, लस वाहतूक वाहनं, वैद्यकीय कच्चा माल वाहतूक. जनावरांशी संबंधित- कृषीची जनावरं, पाळीव प्राणी, वेअरहाऊसिंग, पावसाळ्याची कामं करण्यासाठीचा कर्मचारी, रिझर्व्ह बँक, सेबी, ईकॉमर्स, अधिस्वीकृती धारक पत्रकार, पेट्रोल पंप, कार्गो सेवा, सुरक्षामंडळं सुरू राहतील.
  • किराणा, दूध, भाजीपाला दुकानं सुरू राहतील. कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊस खुली असतील. विविध देशांचे दूतावास कार्यालयं सुरू राहतील. पावसाळ्याची कामं सुरू राहतील. रिझर्व्ह बँक आणि सेबीप्रमाणित कार्यालयं सुरू असतील. टेलिकॉम क्षेत्राशी संबंधित यंत्रणा तसंच मालवाहतूक, पाणीपुरवठा यंत्रणा सुरू राहतील.
  • कृषीक्षेत्राशी निगडीत खतं, बियाणं, उपकरणं, दुरुस्ती सुरू राहील. आयात-निर्यात यंत्रणा. ईकॉमर्स यंत्रणा. डेटा सेंटर्स, क्लाऊड सर्व्हिसेस, आयटी यंत्रणा सुरू राहतील. सरकारी आणि खाजगी सुरक्षायंत्रणा.
  • इलेक्ट्रिक आणि गॅस पुरवठा यंत्रणा. एटीएम, पोस्ट सेवा, बंदरं, परवानाधारक औषधं आणि फार्मा उत्पादनांची वाहतूक करणाऱी वाहनांना परवानगी.

काय सुरु अन् काय बंद राहणार महाराष्ट्र
सरकारने इंग्रजीमध्ये जाहीर केली यादी

Tagged