माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना काही लक्षणे जाणवू लागली असल्याने त्यांनी आज कोरोना चाचणी केली असता ते कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याचे निष्पन्न झाले. मुंबई येथील निवासस्थानी ते विलगिकरणात उपचार घेत आहेत.

विशेष म्हणजे त्यांनी कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतरही ते बाधित झाले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली चाचणी करून घ्यावी तसेच इतरांनीही खबरदारी घेऊन आपली आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. ही माहिती त्यांच्या प्रसिद्धी विभागाकडून आली आहे.

Tagged