दरोडेखोरांनी महिलेसह सात जणांना बेदम मारहाण करुन लुटले

क्राईम न्यूज ऑफ द डे मराठवाडा

पैठण दि.14 : राजकीय वरदहस्तामुळे गोचिडासारखे चिटकून बसलेल्या कर्तव्य शून्य पाचोड पोलिसाच्या नाकावर टिच्चून लाॅकडाऊनमध्ये पाचोड ठाण्याच्या हद्दीमध्ये लूटमार व चोरीचे सत्र सुरूच आहे. शनिवारी (दि.13) मध्यरात्री थेरगाव येथील रोडवरील शेती वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना सात ते आठ दरोडेखोरांनी प्रचंड धुमाकूळ घालून दोन महिलांसह सात जणाला बेदम मारहाण केले. यावेळी या दरोडेखोरांनी किमती ऐवज लुटून नेल्याची घटना घडल्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पैठण तालुक्यातील सध्या कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर तालुका प्रशासनाने लाॅकडाऊन सुरू केले आहे. या काळामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांचे गस्त वाढविण्यात आलेले असतानाही गेल्या अनेक दिवसापासून चोरीचं सत्र सुरू असलेल्या व राजकीय वरदहस्तामुळे गोचीडासारखे चिटकून बसलेले कर्तव्य शून्य कुंभकरण झोपेचं सोंग घेणाऱ्या पाचोड पोलिसांच्या नाकावर टिच्चून थेरगाव येथे गावामध्ये शनिवारी मध्यरात्री सात ते आठ दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून पैठण – पाचोड शेती वस्तीवर राहणाऱ्या अशोक कर्डिले, रंजना अशोक कर्डिले व ताराबाई वामन गोलांडे यांच्यासह चार ते पाच व्यक्तीला बेदम मारहाण करून जखमी केले. घरातील किमती ऐवज लंपास केले. याबाबत पाचोड पोलिसांनी नेहमीप्रमाणे घटनास्थळ जाऊन पोलीस पंचनामा करण्याचे काम सुरू केले. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी श्वान पथक पाचारण करण्यात आले असून या गंभीर प्रकरणामुळे ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पैठण शहरासह तालुक्यात ग्रामीण भागात होणाऱ्या चोऱ्या, दरोडे तत्काळ थांबवावी अशी मागणी या निमित्ताने पुढे येत आहे. या गंभीर घटनेमुळे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे आपल्या पथकासह पाचोडमध्ये दाखल झाले आहे.

Tagged