बंजारा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड  :  शहरातील बंजारा हॉटेलमध्ये शनिवारी (दि.5) आरटीओ कार्यालयातील एजंटचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. या प्रकरणी शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

श्रीमंत उर्फ सिरपा बन्सीधर सरवदे (वय 52 रा.पंचशिलनगर बीड) असे मयताचे नाव आहे. शहरातील बसस्थानकासमोर हॉटेल बंजारामध्ये त्यांचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. दारुच्या नशेतून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून शहर पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. पीएम रिपोर्ट आल्यानंतरच काय प्रकार आहे ते समोर येईल अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे सपोनि.गजानन जाधव यांनी दिली.
—————

Tagged