Sharad Pawar

सिल्व्हर ओकवरील आणखी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र मुंबई

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचे घर असलेल्या सिल्व्हर ओकरवर आणखी 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून आतापर्यंत एकूण 12 जणांना कोरोनाची लागण माहिती समोर आली आहे.

सोमवारी (दि.17) सकाळी सिल्व्हर ओकवरील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले. खा.शरद पवार यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. त्यावेळी एकूण सहा जण कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यापैकी कोणीही पवारांच्या संपर्कात नव्हते, रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे सिल्व्हर ओकवरील इतर सर्व कर्मचारी आणि पवारांच्या पीए यांचीही कोरोना चाचणी करण्यात आल्या. यात आणखी 6 जण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून आतापर्यंत एकूण 12 जणांना कोरोना झाला आहे. त्यामुळे खा.शरद पवार पुढील काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, खा.शरद पवार यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Tagged