माजलगाव कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंतराव घाटूळ यांचे निधन!

बीड

माजलगाव: माजलगाव सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंतराव घाटूळ यांचे मंगळवारी सकाळी हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. मागील आठ दिवसापूर्वी त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर शहरातील यशवंत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले होते. ते रविवारीच हॉस्पिटलमधून घरी आले होते.
आज पहाटे त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू समयी ते 64 वर्षाचे होते. त्यांच्यावर येथील मंगलनाथ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कार्यारंभ परिवार त्यांच्या दुःखात सहभागी आहे.

Tagged