kaij-sachin-deshpande-2

नायब तहसीलदारांची बदली करू नये

केज कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

केज : येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांच्या बदलीची मागणी करत पाच राजकीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच बोंबा मोरो आंदोलन केले होते. आता त्यांची बदली करु नये म्हणून समर्थनार्थ पत्रकारांसह भाजपच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना (दि.27) गुरुवारी निवेदन देण्यात आले आहे.

येथील तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार सचिन देशपांडे हे कार्यालयीन वेळेत सतत हजर राहून तालुक्यातील सर्वांचे कामे निःपक्षपातीपणे करतात. त्यांच्याकडे आलेली प्रकरणे ते तात्काळ मार्गी लावतात, असे असतानाही वैयक्तिक हेव्यादाव्यापोटी एका कर्तव्य दक्ष अधिकार्‍याच्या बदलीची मागणी केली जात आहे. नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांची बदली करु नये. प्रशासनाने जर नायब तहसिलदार सचिन देशपांडे यांची बदली केली तर सक्रीय पत्रकार संघ लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचा लेखी इशारा केज सक्रीय पत्रकार संघाने दिला आहे. याबाबतचे निवेदन पेशकार पठाण यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी सक्रीय पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सोनवणे, अभय कुलकर्णी, मधुकर सिरसट, श्रावणकुमार जाधव, विनोद शिंदे, रामदास तपसे, दिपक नाईकवाडे, रामदास साबळे, डी.डी.बनसोडे, हनुमंत सौदागर, इक्बाल शेख, मजहर शेख, माजी अध्यक्ष सय्यद माजेद, महादेव गायकवाड, सचिन उजगरे, सोमनाथ लामतूरे आदी उपस्थित होते. दरम्यान, भाजपच्यावतीने तालुकाध्यक्ष भगवान केदार, श्रीकांत भांगे यांनी निवेदन दिले.

Tagged