rajesh tope

महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथकं

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र

जालना : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत अनेक रुग्णांची रुग्णालयांकडून लबाडणूक होते. ही लूट थांबवण्यासाठी राज्य सरकारने एक परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये योजनेचा पूर्ण अभ्यास करून रुग्णालयांच्या तपासणीसाठी भरारी पथकांची नेमणूक करावी असा आदेश राज्यभरातील जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालन्यातील 40 बेडचं कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना ना.टोपे म्हणाले की, जिल्हाधकार्‍यांनी या पथकात जावून स्वत: किमान पाच रुग्णालयांची तपासणी करणं आवश्यक असल्याचं म्हणत याच्या अमंलबजावणीसाठी परिपत्रक जारी केलं आहे. गोर गरीब जनतेला खाजगी रुग्णालयातही मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य सरकारनं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु केली. मात्र याच योजनेत मोठा भष्ट्राचार सुरु असल्याचे समोर आले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा जिल्हा असलेल्या जालन्यात एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. योजनेतील अधिकारी आणि एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांचं हे संभाषण आहे. यामध्ये रुग्णालय योजनेशी सलग्न करण्यासाठी डॉक्टरानं चार लाख रुपये दिल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळं ऑडिट न करताच हे अधिकारी पैसे घेवून रुग्णालय सलग्न करतात हे उघड झालं होतं. या व्हिडीओमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील जिल्हा समन्वयक डॉक्टर गुरुराज थत्तेकर, जिल्हा प्रमुख अमित दरक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्नील अपरे त्याचबरोबर एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टर दिसत आहेत. विषेश म्हणजे या व्हिडिओ क्लिपमध्ये आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या नावाचाही उल्लेख आहे. त्यानंतर या तीनही अधिकार्‍यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

Tagged