सोनिया गांधींनी माजी खा.रजनी पाटील यांना दिली ‘ही’ जबाबदारी

केज न्यूज ऑफ द डे राजकारण

केज : भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खा.सोनिया गांधी यांनी आज (दि.11) सीडब्ल्यूसीची (काँग्रेस वर्किंग कमिटी) घोषणा केली. या निवडीत निष्ठावंतांवर मोठ्या जबाबदारी सोपविण्यात आल्या आहेत.

या निवडीत सोनिया गांधी यांच्या विश्वासू समजल्या जाणार्‍या काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या तथा माजी खासदार रजनीताई पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांना जम्मू व काश्मीरच्या प्रभारी पदावर नियुक्त करण्यात आले. तसेच, काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल बीड जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, सेवादल, एन.एस.यु.आय.च्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहेत.

Tagged