मासे पकडण्यासाठी गेलेल्या चुलत्या, पुतण्याचा शॉक बसल्याने दुर्दैवी मृत्यू

क्राईम धारूर न्यूज ऑफ द डे बीड

धारूर: नदीच्या डोहात सोडलेला विजेचा शॉक लागून दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धारूर तालूक्यातील काळ्याचीवाडी येथे घडली.
समाधान सहदेव रुपनर ( वय21) आणि दिपक मारूती रुपनर ( वय19 )अशी मृतांची नावे असून ते नात्याने चुलते-पुतणे होते. गुरुवारी सांयकाळी नदीवर मासे पकडण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली. सायंकाळी गावापासून एक कि.मी असणाऱ्या नदीच्या डोहात विजेचा कंरट सोडून मासे पकडण्यासाठी गेले होते. मात्र हे त्यांच्या अंगलट आले. विजेचा शॉक लागून दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. दोघेही घरी परतले नाहीत म्हणून समाधानचे वडील काही ग्रामस्थांसह नदीकडे गेले. त्यावेळी त्यांना दोघेही मृत अवस्थेत आढळून आले. मृतामधील समाधान हा पोलीस भरतीची तयारी करत होता, तर दिपक आयटीआयची परीक्षा देऊन आला होता. धारूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली करण्यात आली मात्र दिवाळीत झालेल्या घटनेने काळ्याचीवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

Tagged