crime

बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड

गेवराई  दि.18 : गेवराई शहरातून दोन तीन दिवसापूर्वी एक 16 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली होती. बुधवारी (दि.18) सकाळी एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
सायली कल्याण पारेकर (वय 16 रा.गणेशनगर, गेवराई) असे मुलीचे नाव आहे. ती गेवराई शहरातून बेपत्ता असल्याची तक्रार दोन दिवसापुर्वी गेवराई शहर पोलीसात नोंद करण्यात आली आहे. बुधवारी गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी परिसरामध्ये एका विहिरीत एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच गेवराई पोलीस ठाण्याचे पोनि.पुरुषोत्तम चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.युवराज टाकसाळ यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा मृतदेह सायलीचा असल्याची ओळख पटली. मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हारुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सायलीने आत्महत्या केली. की, घातपात आहे. याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी गेवराई शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Tagged