attack on press reporter

पत्रकाराला विजेच्या खांबाला बांधून मारहाण

क्राईम देश विदेश न्यूज ऑफ द डे

व्हीडिओ झाला व्हायरल

गुवाहटी -भूमाफीयांच्या विरोधात बातमी दिली म्हणून एका पत्रकाराला विजेच्या खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. या धक्कादायक घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आसाममधील प्रतिदिन नावाच्या दैनिकाचा हा पत्रकार आहे.
मिलन महंता रस्त्याच्या बाजुलाच असलेल्या एका दुकानापाशी थांबलेले असताना काही जणांनी त्यांना अचानक घेरलं. त्यानंतर त्यांना विजेच्या खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. व्हिडिओत पाच व्यक्ती पत्रकाराला मारहाण करताना दिसत आहे. ही घटना गेल्या रविवारी मिर्झा खोर्‍यात घडली. हा भाग राजधानी गुवाहाटीपासून पश्चिमेला जवळपास 40 किलोमीटर अंतरावर आहे. हल्ल्यात मिलन महंता यांच्या गळ्यावर, डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली असल्याचे स्थानिक मीडियाने म्हटले आहे. त्यांनी पलाश बारी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या घटनेची तक्रार नोंदवली आहे. जुगार्‍यांनी आपल्यावर हा हल्ला केल्याचं महंता यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय. दिवाळी दरम्यान महंता यांनी आसाममध्ये या भागात वाढत्या जुगाराच्या अड्ड्यांविरोधात माहिती देताना एक संपूर्ण सीरिज केली होती. पत्रकारानं दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून एका व्यक्तीला अटक करण्यात आलंय. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितले. पत्रकारावरच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी काही पत्रकारांनी आंदोलनही केलं. हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाईची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

Tagged