विदेशी दारू घेऊन जाणारा ट्रक पलटी

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


नेकनूर: विदेशी दारू घेऊन जाणार ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने नेकनूर परिसरात गुरुवारी (दि.19) पहाटे पलटी झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नाशिकवरून लातूरकडे विदेशी दारू घेऊन निघालेला ट्रक (एमएच 15 सीके 1555) नेकनूर परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने पहाटे पलटी झाला. ट्रक मधील दारुचे बॉक्स रस्त्यावर पडले होते. या अपघाताची माहिती नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे चोरीचा प्रकार घडला नाही.

Tagged