school Palwan

बीड जिल्ह्यात सोमवारपासून केवळ 10 वी, 12 वीचे वर्ग सुरु होणार

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचा निर्णय

बीड, दि. 21 : शाळा सुुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर दिल्यानंतर अधिकारी वर्गाची मनमानी सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. आज जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शिक्षण विभागाची बैठक घेतली. यात त्यांनी जिल्ह्यातील केवळ 10 आणि 12 वीचे वर्ग सोमवारपासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी दोघेही या बैठकीय उपस्थित होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. आणखी दोन ते तीन दिवसा पॉझिटीव्ह रुग्णांचा रेट काय राहतो त्यानंतर आपण शाळा सुरु करायच्या की नाही याबाबत अंतिम निर्णय घेऊ असे सांगितले. त्यामुळे 26 जानेवारीनंतरच आता जिल्ह्यातील शाळांबाबत निर्णय होईल, असे दिसते. याबाबत बोलताना शिक्षणाधिकारी सारूक म्हणाले, जिल्ह्यातील केवळ 10 आणि 12 वीचे वर्ग सुरू करण्यास आम्हाला परवानगी मिळाली आहे. त्याचा अधिकृत आदेश आज सायंकाळपर्यंत निघेल. आणखी दोन दिवसांनी यासंदर्भात बैठक होणार आहे.

Tagged