‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


अंमळनेर  दि.31 : खून करून चेहरा विद्रुप करून झुडपात फेकण्यात आला होता. सदरील इसमाची गुरुवारी सकाळी ओळख पटली. तो मृतदेह पाटोदा तालुक्यातील साबळेवाडी येथील दिलीप विठोबा साबळे यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. बायोमेट्रिक मशिनच्या साह्याने आधार कार्ड वरून ओळख पटवली आहे.
सदरील इसमाच्या अंगावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन चेहर्‍यावर अ‍ॅसिड टाकून चेहरा विदृप करण्यात आला होता. सदरील मृतदेह अमळनेर परिसरात बुधवारी (दि.30) आढळून आला आहे. सदरील मयताची ओळख पटलेली नव्हती. अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीतील डोंगरकिन्ही येथील गोळीबाराचे प्रकरण ताजे असतानाच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. अंमळनेर पोलीसांनी आधारकार्डवर बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पटवली आहे. सदरील मृतदेह हा पाटोदा तालुक्यातील सबळेवाडी येथील दिलीप विठोबा साबळे यांचा आहे. पुढील तपास अंमळनेर पोलीस करत आहेत.

Tagged