भूमी अभिलेख उपअधीक्षक शितोळेला पंधरा हजारांची लाच घेतांना पकडले

क्राईम न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

पैठण  दि.15 : पैठण भुमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक जयदिप मधुकर शितोळे यास पंधरा हजारांची लाच घेतांना सोमवारी (दि.15) सायंकाळी पैठण तहसील कार्यालयात रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांना त्यांच्या वडीलांच्या नावे असेलेली जागा वाटणीपत्राद्वारे त्यांच्या वाट्याला आलेली क्षेत्रफळाची नोंद सिटी सर्व्हेला करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला होता. सदरचा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी तालुका भुमी अभिलेख पैठण, यांच्याकडे पाठवल्याने त्यांनी उपअधिक्षक, तालुका भुमी अभिलेख उपअधीक्षक जयदिप शितोळे यांनी क्षेत्रफळाची नोंद करण्यासाठी वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडअंती तक्रारदाराकडून 15 हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताना भुमी अभिलेख कार्यालयातच पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक रविंद्र निकाळजे, ज्ञानदेव जुंबड, मनोहर खंडागळे, अनिल सानप, ज्ञानेश्वर म्हस्के, गजानन घायवट, जावेद शेख, शिवाजी जमधडे, गणेश चेके, सचिन राऊत, कृष्णा देठे, गणेज बुजाडे, गजानन कांबळे, चालक प्रविण खंदारे, आरेफ शेख यांनी केली.
—————

Tagged