ACB TRAP

37 हजारांची लाच घेताना बीडीओ पकडला

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.17 : बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 37 हजारांची लाच घेताना बीडोओला रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.17) सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
     पाटोदा व बीड येथील बीडीओ नारायन मिसाळ यांना 37 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. मिसाळ यांनी तक्रारदाराकडे विहिरीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. मिसाळ यांच्या नगर रोडवरील राहत्या घरी एसीबीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Tagged