बीड दि.1 : लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. काही दिवसापूर्वीच बीडमध्ये बीडीओ व माजलगावमध्ये एसडीएमला लाच घेताना पकडले होते. त्यानंतर बीड येथील लेखा परिक्षण कार्यालयात सोमवारी (दि.1) रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
किरण घोटकर असे लाचखोर अधिकार्याचे नाव आहे. किरण घोटकर हा लेखा परिक्षण कार्यालयात सहाय्यक संचालक लेखा परिक्षण (वर्ग 1) या पदावर आहे. त्यास वीस हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या टिमने केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
