अंबाजोगाई खून प्रकरण;आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा ठिय्या

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

अंबाजोगाई दि.2 : शहरातील मोरेवाडी परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ सोमवारी (दि.1) सायंकाळी साडे सातच्या सुमारास मोरेवाडी येथील युवकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. अन्य दोन आरोपी फरार आहेत. फरार आरोपींना जो पर्यंत ताब्यात घेतले जात नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. अस पवित्रा नातेवाईकांनी घेत अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे. यामुळे ठाणे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
गणेश सुंदरराव मोरे (वय 20, रा.मोरेवाडी ता.अंबाजोगाई) असे मयत युवकाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार मोरेवाडी परिसरात पाण्याच्या टाकीजवळ लोखंडी सावरगाव रोडवर गणेश मोरे याच्यावर काही व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात दगडाने ठेचून आणि धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर ठाण्याचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार, फौजदार सूर्यवंशी, कांबळे, एएसआय बोडखे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. अन्य दोन आरोपी फरार असून त्यांनाही तत्काळ अटक करा. जोपर्यंत त्यांना अटक केली जात नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

Tagged