untavarun warat

मित्र मंडळीचा संपर्क नको म्हणत, साळेगावातून निघाली उंटावर वरात

केज न्यूज ऑफ द डे

मधुकर सिरसाट/ केज

दि. 3 : कोरोनामुळे नवरदेवाच्या मित्र मंडळी पासून लांब राहण्यासाठी एका नवरदेवाला चक्क घोड्या ऐवजी उंटावर स्वार होऊन वरात काढावी लागली. याची चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे.

केज तालुक्यातील साळेगाव येथील माजी सैनिक महादेव व सौ. सिमा वरपे यांचे चिरंजीव पत्रकार अक्षय वरपे यांचा विवाह उस्मानाबाद जिल्ह्यातील खामसवाडी येथील ऐश्वर्या हिच्याशी संपन्न झाला. परंतु वराचे आईवडील आणि त्यांचे मामा, मेव्हणे आणि मित्र यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम आणि दक्षता पाळूनही गर्दी आणि नवरदेवाशी वरातीत लोकांचा संपर्क येऊ नये यासाठी नवरदेवाला घोड्यावर न बसविता चक्क उंटावर बसवून वरात काढली. यामुळे गावातून व तालुक्यातून उंटावरून वरात निघालेले पत्रकार अक्षय वरपे यांचे एकमेव लग्न पार पडले. या आगळ्या पद्धतीने पार पडलेल्या उंटावर स्वार झालेल्या नवरदेवाकडे उपस्थित कुतूहलाने पहात होते. वधू-वरांच्या आई-वडिलांनी त्यांच्या नातेवाईक आणि मित्र मंडळी यांना कोरोना व साथ रोगाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून प्रत्यक्ष लग्नाला हजर न रहाता फोन वरून शुभेच्छा दिल्या तरी चालतील अशी विनंती केल्याने त्या नवपरिणीत जोडप्यांना दिलेल्या शुभेच्छाचा स्विकार केला.

Tagged