rummy, tirat, jugar

21 जुगार्‍यांसह अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राईम न्यूज ऑफ द डे पाटोदा बीड

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई
बीड दि.9 : जुगार अड्ड्यावर छापा टाकत 21 जुगार्‍यांसह अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने आंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळेवाडी शिवारात सोमवारी दुपारी केली. या प्रकरणी आंभोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळेवाडी शिवारात साखराबाई काकडे यांच्या घराच्या समोर मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरु होता. याची माहिती विशेष पथक प्रमुख सपोनि.विलास हजारे यांना मिळाली. त्यांनी सोमवारी दुपारी आपल्या टीमसह जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी तेथे तिर्रट नावाचा जुगार खेळतांना 21 जुगारी आढळले. यामध्ये शिवाजी विश्वनाथ गर्जे (रा.खिळद ता.आष्टी), संजय पोपट वालेकर (रा.देवीगव्हाण ता.आष्टी), यशवंत कोंडीबा खंडागळे, हनुमंत सिताराम बुद्धीवंत, नवनाथ दशरथ रोडे (रा.शिराळा) ज्ञानदेव दौलत गांगर्डे (रा.निमगाव गांगर्डा ता.कर्जत), बाळासाहेब अजुर्न राळेभात (रा.जामखेड), राजेंद्र हिरालाल शेळके, बंडु बाबासाहेब वायबसे, दिनकर साहेबराव नागरगोजे, गणेश विठ्ठल दिघे, चंद्रभान आश्रुबा लोखंडे, लहु शांताराम माने, सुधाकर सुभाष तारू, विकास उत्तम मस्के, सोनु बापु औटे, राजु सायबा उमरे, सुभाष रामा फुलमाळी, केशव शिवाजी उधावंत, बाळासाहेब नारायण बंडाळे, शिवाजी रामभाऊ काळे यांना पोलीसांना ताब्यात घेतले. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख सपोनि.विलास हजारे यांनी केली.

Tagged