जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचा अंबाजोगाई शहर ठाण्यात ठिय्या

अंबाजोगाई न्यूज ऑफ द डे बीड

अंबाजोगाई पोलीस ठाण्याच्या निरिक्षकांकडून अवमनाजनक वागणूकअंबाजोगाई :  एका प्रकरणात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गेलेले ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांना पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार यांनी अत्यंत अवमानजनक वागणूक दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या नंदकिशोर मुंदडा यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या दिला.

अधिक माहिती अशी की, मतदार संघातील महिलांसह काही नागरिकांच्या समवेत ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा अंबाजोगाई. शहर पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी तुम्ही विना परवानगी माझ्या कक्षात कसे बसले असे म्हणत शहर ठाण्याचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार यांनी आकांडतांडव सुरू केला. अरेरावीची भाषा वापरत त्यांनी सर्वांना बाहेर काढले. यावेळी मुंदडा यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता अत्यंत उद्धटपणाची भाषा वापरत त्यांनी मुंदडा यांना अवनानजवक वागणूक दिली. यामुळे संतप्त झालेल्या मुंदडांनी कार्यकर्त्यांसमवेत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. या घटनेची माहिती  मिळताच शहरातील अनेक प्रतिष्ठीत नागरिकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत मुंदडा यांचे आंदोलन सुरू होते.

पोलीस निरिक्षकांची दिलगिरी
अद्यापपर्यंत नंदकिशोर मुंदडा यांची प्रत्यक्षात भेट झालेली नसल्यामुळे मी त्यांना ओळखू शकलो नाही. अनावधानाने माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.

चौकशी करून कार्यवाही करणार : अपर अधीक्षक स्वाती भोर
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अपर अधीक्षक स्वाती भोर यांनी रात्री शहर पोलीस ठाण्यात येत नंदकिशोर मुंदडा यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

पोलीस निरिक्षकांच्या भुमिकेबद्दल नागरिकात आश्चर्य
शहरात सर्वत्र अवैध धंदे राजरोस सुरू आहेत. सहाजिकच शहर पोलीस ठाण्याच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही. अवैध धंदेवाल्यांचाही ठाण्यात राबता असतो, त्यांना सन्मानाची वागणूक मिळते. मात्र सतत लोकसेवेत कार्यरत असणारे नंदकिशोर मुंदडा यांची दोन महिन्यातही पोलीस निरिक्षकांना ओळख नसावी याबाबत नागरिकातून आश्चर्य  व्यक्त होत आहे. विद्यमान आमदारांच्या सासऱ्यांना अशी वागणूक मिळत असेल तिथे सामान्यांचे काय? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

Tagged