गेवराई दि.4 : येथील तहसील कार्यालयातील एका कर्मचार्याला खाजगी दलाल व त्याच्या सहकार्यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि.2) घडली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई तहसील कार्यलयात रेकॉर्डच्या बाहेर खाजगी दलाल सुनिल सुतार व त्यांच्या सोबत चार ते पाच जण मद्यप्राशन करून बसले होते. एका सातबार्यासाठी तहसीलचे कर्मचारी सुनील गित्ते यांच्याकडे सुतार व त्यांचे सहकारी गेले. त्यानंतर जुन्या सातबार्यासाठी वाद घालू लागले. यावेळी सुनील सुतार व इतरांनी रेकॉर्ड रूममधील कागदपत्रे फेकून देत सुनील गित्ते यांना चापट मारली. त्यामुळे गेवराई पोलीस ठाण्यात चौघांवर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक मनिषा जोगदंड करत आहेत.
