पुरलेल्या अवस्थेत सापडले अर्भक

क्राईम न्यूज ऑफ द डे पाटोदा

सावरगावानजीक खटकेवस्ती परीसरातील घटनेने खळबळ

पाटोदा : एका शेतकर्‍याच्या शेतात अर्भकाचे कुत्रे लचके तोडत असल्याचे दिसून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाटजवळ खटकेवस्तीवर घडली.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार खटकेवस्तीवर गुरुवारी सायंकाळी शेतकरी प्रभु खटके व परमेश्वर खटके यांच्या शेतामधील बांधावर पुरलेल्या अवस्थेतील अर्भकासदृश आकार असलेल्या शरीराराचे कुत्रे लचके तोडत असलेले एका शेतकर्‍याने पाहीले. ही माहीती त्यांनी सावरगावातील युवा कार्यकर्ते संदेश सानप यांना दिली. या ठिकाणी प्रचंड दुर्गंधीही सुटली होती. सानप यांनी तात्काळ अंमळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय शामकुमार डोंगरे यांना ही माहीती दिली. त्यानंतर तातडीने अंमळनेर पोलीसांचे पथक घटना स्थळी पोहोचले होते. पुरलेल्या अवस्थेत सापडलेले अर्भकच होते का? व नेमके कोणत्या जातीचे होते याविषयी अद्याप स्पष्ट झालेले नव्हते. वैद्यकीय पथकालाही या ठिकाणी पाचारण करण्यात आले आहे. रात्री उशीरा मिळालेल्या माहितीनुसार सदरील मृतावस्थेत सापडलेले अर्भक हे पुरुष जातिचे असून ते नऊ महिन्याचे होते अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहितकुमार कागदे यांनी दिली.

Tagged