बीड दि.6 : करूणा शर्मा याना सोमवारी (दि.6) अंबाजोगाई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
परळी येथे रविवारी (दि.5) करुणा शर्मा या ना.धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यासह अन्य एकावर अनुसाचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी अंबाजोगाई येथील न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपअधीक्षक सुनील जायभाये करत आहेत.