..तर आपल्याविरूद्ध गुन्हा का दाखल करू नये?; एपीआयचे थेट न्यायाधीशांना पत्र

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीडच्या एसपींकडून चौकशी; पत्र सोशल मीडियावर व्हायरल

वडवणी : आपण आम्हाला नुकसान पोहचविण्यासाठी आम्हाला धाक दाखवत आहात, त्यामुळे आपणाविरूद्ध गुन्हा का दाखल करू नये? असे पत्र वडवणीच्या सहायक पोलीस निरीक्षकांनी थेट वडवणीच्या प्रथम वर्ग न्यायालयाच्या न्यायदंडाधिकार्‍यांना माजलगावच्या उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत दि.17 नोव्हेंबर रोजी लिहले आहे. आता हे पत्र बनावट असल्याचा दावा संबंधित पोलीस अधिकार्‍याने पोलीस अधीक्षकांकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सदरील धमकीचे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रकरणाची दखल घेऊन पोलीस अधीक्षक आर राजा यांनी वडवणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर यांना चौकशीसाठी बोलावून घेतले होते. तत्पूर्वी, त्यांनी हे पत्र आपले नसल्याचे सांगितले. परंतू त्यावर वडवणी पोलिसांचा सही आणि शिक्का आहे. मात्र, सदरील पत्र हे दोन दिवसांपासून फिरत असल्याची कबुली देखील एपीआय मिरकर यांनी दिली.

काय म्हटले आहे पत्रात?
1.लोकसेवक असून स्वतः कशाप्रकारे आचरण करावे याबाबत कायद्यामधील तरतुदीची माहीती असताना जाणीवपूर्वक आम्हास नुकासान व्हावे या उद्देशाने कायद्याची अवज्ञा केल्याचे दिसुन आले आहे. 2.आम्हास नुसान पोहोचविण्याचे उद्देशाने आपण लोकसेवक असतानाही चुकीचे दस्तऐवज तयार केले आहात 3. आपण लोकसेवक असुनही मा. पोलीस अधीक्षक, बीड यांना जाणीवपूर्वक खोटी माहीती खरी आहे म्हणुन पूरविली आहात. 4. आपण आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर करून आम्हास नुकसान व्हावे या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक बीड यांना खोटी माहीती पूरविली आहात. 5. अशा प्रकारे आम्ही लोकसेवक असतानाही वरिल प्रमाणे आम्हास नुकसान पोहोचविण्याचा धाक देवून आपण भा.द.वि कलम 166,167, 177, 182 (ब) व 189 चे उल्लंघन केल्याचे दिसून आले अशी आमची धारणा असून याबाबत आपणाविरूद्ध गुन्हा का नोंदविण्यात येऊ नये? याबाबत आम्हास कळवावे अशी विनंती देखील यात केली आहे. सदरचे पत्र दोन दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या पत्राची सर्वत्र चर्चा होत आहे.

1
2
Tagged