बीडमध्ये 16 लाखांचा गांजाजप्त; चौघांवर गुन्हा दाखल!

बीड


बीड दि.26 : सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी महिनाभरापूर्वीच चकलांबा ठाणे हद्दीत गांजा तस्करावर कारवाई केली होती. त्यानंतर आज मंगळवारी (दि.26) बीड तालुक्यातील करचुंडी येथे गांजावर मोठी कारवाई केली. यावेळी तब्बल 16 लाख 54 हजार 600 रुपयाचा गांजा जप्त करत चौघांवर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे नेकनुर हद्दीतील करचुंडी (ता.जि.बीड) येथील बाळासाहेब देवराव शिंदे ( वय 35), बंकट कल्याण शिंदे, (वय 35), डिगांबर आश्रुबा शिंदे (वय 45), कुंडलीक निवृत्ती औटे (सर्व रा.करचुंडी ता. केज जि.बीड) यांनी त्यांचे स्वत:चे मालकीचे शेतात बेकायदेशिररित्या गांज्याची लागवड करुन त्याचे संवर्धन केले आहे. त्यावरून खात्री करत मंगळवारी पंकज कुमावत यांनी याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनासाठी नायब तहसीलदार प्रशांत सुपेकर, नेकनुर ठाण्याचे सहायक निरीक्षक विलास हजारे, दोन शासकीस पंच, उपनिरीक्षक पानपाटील, रोकडे, पोह.बालासाहेब डापकर, डोंगरे, क्षीरसागर, बळवंत, दिलीप गित्ते, पुंडे, शेळके, मुंडे, पोलीस अंमलदार शमीम पाशा, ढाकणे, क्षीरसागर, राख, राऊत, होमगार्ड धन्वे, शेख, वरभाव, कुलकर्णी, वाघमारे, शेख, घरत यांनी शेतात छापा मारला. यावेळी 330 कि.ग्रॅ. गांजा ज्याची किंमत 16 लाख 54 हजार 600 रुपये असा लागवड केलेला मिळुन आला. कुंडलीक निवृत्ती औटे हा फरार असून वरील तीनही आरोपी अटक आहेत. या प्रकरणी नेकनुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tagged