court

मांगवडगाव तिहेरी हत्याकांड प्रकरणी पाच आरोपी दोषी

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

महाराष्ट्रभरात गाजले होते प्रकरण

केज : तालुक्यातील मांगवडगाव येथे शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली होती. ही १३ मे २०२० रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती. या प्रकरणातील पाच आरोपींना अंबाजोगाई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

येथील जिल्हा व सत्र न्यायालयात चालु असलेल्या मांगवडगाव येथील खुन प्रकरणात (विशेष सत्र केस क्र. 43 / 2020) महाराष्ट्र शासन वि. सचिन निंबाळकर व इतर 13 या प्रकरणात दुसरे सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी पाच आरोपी सचिन मोहन निंबाळकर, हनुमंत उर्फ पिंटु मोहन निंबाळकर, बालासाहेब बाबुराव निंबाळकर, राजाभाउ हरिश्चंद्र निंबाळकर, जयराम तुकाराम निंबाळकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. फिर्यादी हे पारधी समाजाचे होते. फिर्यादीचे बामध्ये व आरोपीमध्ये जमीनीबाबत जुना वाद होता. त्या अनुशंगाने आरोपींनी मयत बाबु शंकर पवार यास सन 2006 मध्ये मारहाण केली होती. नंतर सदर जमीनीच्या वादाचा निकाल हा फिर्यादीचे बाजूने लागला होता. त्यामुळे दि.13/05/2020 रोजी सांयकाळी फिर्यादी, मयत बाबु शंकर पवार त्याचे मुले, सुना असे सर्व जण वादग्रस्त जमीनीवर जिवनावश्यक सर्व सामानासह ट्रॅक्टरने गेले असता सर्व आरोपींनी चिडून त्यांचेवर शस्त्रासह दगड फेकुन हल्ला चढवून ट्रॅक्टर अंगावर घातले व त्यांना गंभीर मारहाण केली. त्यामध्ये त्यांनी बाबु शंकर पवार, संजय बाबु पवार, प्रकाश बाबु पवार या तिघांचा खुन केला व ते तिथे शेतातच मयत झाले. या मारहाणी मध्ये दादुली प्रकाश पवार ही देखील गंभीर जखमी झाली होती. परंतु उपचारादरम्यान तिचा जीव वाचला. तसेच या मारहाणीमध्ये धनराज बाबु पवार, सुरेश शिवाजी पवार, शिवाजी बाबु पवार, संतोष संजय पवार इत्यादी देखील गंभीर जखमी झाले. सदर प्रकरणात फिर्यादी धनराज बाबु पवार याचे फिर्यादीवरुन पो.स्टे. युसुफवडगाव येथे गु.र.नं. 106/2020 कलम 302, 307, 120 ब, 325, 143, 147, 148, 149, 435, 427, 323 भा.द.वी. सह कलम 25 शस्त्र अधिनियम सह कलम 3 (1) (g), 3 (2) (ra), 3 25 शस्त्र अधिनियम सह कलम 3 (1) (g), 3 (2) (ra), 3 (2) (r) अ. जा. ज. अ. प्र. कायद्यान्वये आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानुसार आरोपी अटक करून गुन्हाचा तपास पोलीस अधिकार राहुल धस यांनी करून आरोपी विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण सोळा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात जखमी साक्षीदार, डॉक्टर, पोलीस अधिकारी वगैरे साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली व ती साक्ष ग्राहय धरुन तसेच सरकारी वकील यांचा युक्तीवाद ग्राहय धरून दुसरे सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी पाच आरोपीना शिक्षा ठोठावली आहे.

Tagged