टीईटी

टीईटीचा निकाल जाहीर, 16, 592 शिक्षक पदासाठी पात्र

करिअर न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

मुंबई: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत असलेल्या अनेक चुकांमुळे हि परिक्षा वादाच्या भोवर्‍यात सापडली होती.

19 जानेवारी रोजी राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षा घेण्यात आली. पेपर 1 म्हणजे पहिली ते पाचवी गटासाठीचा पेपर एक लाख 88 हजार 688 उमेदवारांनी दिला. त्यापैकी 10 हजार 487 उमेदवार पात्र झाले. तर, पेपर दोन म्हणजे सहावी ते आठवी गटासाठीचा हा पेपर एक लाख 54 हजार 596 उमेदवारांनी दिला. त्यातून सहा हजार 105 उमेदवार पात्र झाले. म्हणजे या परीक्षेत 16, 592 उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र झाले आहेत.

टीईटी परीक्षेच्या निकालात आरक्षण प्रवर्ग, वैकल्पिक विषय, अपंगत्व आदींचा लाभ मिळाले नसल्यास तक्रारीची सुविधा येत्या 15 ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे.  या परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांना त्यांच्या प्रमाणपत्राची प्रत प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्‍यांमार्फत पाठवण्यात येईल, अशी माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.

या वेबसाईटवर निकाल घोषित करण्यात आला आहे: http://www.mahatet.in/

Tagged