आमदार सोळंके साहेब माजलगावचा हाच का विकास?

बीड

– व्यापार्यावर दुकान बंद ठेवण्याची वेळ

– मोंढ्याच्या प्रवेशद्वारावर पाणीच पाणी

माजलगाव -शहरातील मोंढ्याच्या प्रवेशद्वारावर गुडघा भर पाणी साचल्याने व्यापारी, ग्राहक, नागरिक परेशान झाले आहेत. आमदार साहेब हाच माजलगाव चा विकास आहे का?आसा सर्व सामान्य नागरिकांना प्रश्न पडत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील मोंढा प्रवेशद्वारावर वर्षांपासून नियमितपणे नळाच्या पाण्याचे लिकेज व नालीचे पाणी या रोडवर येते. या पाण्यामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. या पाण्यामुळे आनेक व्यापारी आपली दुकाने इतरत्र स्थलांतरित करत आहेत. तर काही व्यापाऱ्यांनी सतत पाणी साचत आसल्याने दुकाने बंद केली आहेत. पाणी साचल्याने या भागात कसलेच ग्राहक येत नाही. यामुळे मोंढ्यातील व्यापारी पाण्यामुळे संतप्त झाले आहेत. व्यापाऱ्यांनी या पाण्यामुळे आनेक आंदोलने केली अक्षरशःपाण्यात बसून आंदोलन केली पण आनेक वेळेस आमदार प्रकाश सोळंके यांना भेटलो कित्येक वेळेस मुख्यअधिकारी,नगराध्यक्ष, नगरसेवकांना भेटलो पण प्रश्न मार्गी लागला नाही .शेवटी रविवारी रोजी पाणी एवडे साचले आहे की मार्केट बंद ठेवण्याची वेळ व्यापारी वर्गावर आली आहे.तर सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला आहे की आमदार प्रकाश सोळंके यांनी हाच माजलगाव चा विकास केला आहे का?

दोन वर्षात आमदारांना स्वःतच्या संस्थे समोरचे लिकेज निघाले नाही

स्वःता आमदार प्रकाश सोळंके यांच्या महीला जागृती पतसंस्था व ग्राहक भंडार असलेल्या संस्थे समोर बाजार समिती, नगर परिषद त्यांच्या ताब्यात आसुन सुध्दा त्यांना त्यांच्या दारासमोर चे दोन वर्षांपासुन लिकेज निघाले नाही तर सर्वसामान्याच्या प्रश्नाचे काय आसा सवाल नागरिक करत आहेत.

मोंढा मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेऊ – आशोक बिक्कड

या पाण्यामुळे आनेक आंदोलने केली लोकप्रतिनिधीनां भेटलो ,प्रशासनाने आम्हाला लेखी देऊन ही जर प्रश्न मार्गी लागत नसेल तर आम्ही सर्व व्यापारी मोंढा मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेऊ असे व्यापारी आशोक बिक्कड यांनी सांगितले.