वाशी परिसरात कारची काच फोडून बीड येथील दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला!

क्राईम न्यूज ऑफ द डे पश्चिम महाराष्ट्र बीड

बीड दि.20 : बीड येथे वास्तव्यास असलेले बडे दाम्पत्य काही कामानिमित्त सोलापूरला गेले होते. तेथून बीडकडे येत असताना त्यांच्या इनोव्हा कारवर धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाशी परिसरात अचानक 15 ते 20 जणांनी सशस्त्र हल्ला चढवला. गाडीचा काच फोडून बडे दाम्पत्यास गाडीच्या बाहेर काढून मारहाण केली. तसेच त्यांच्या जवळील नगदी रोकडसह सोने-चांदीचे दागिने लुटले. यावेळी रस्त्यावरुन जाणार्‍या दुचाकीवरील अन्य दोघांनी सदरचा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी त्या दोघांवरही प्रचंड हल्ला करून जखमी केले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या प्रकरणी वाशी पोलीसात 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 14 आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

बीड शहरातील सारडा नगरी भागात श्रध्दा बिल्डींगमध्ये राहणार्‍या वर्षा विशाल बडे व त्यांचे पती विशाल बडे हे दोघे परवा आपली इनोव्हा कारने (एम.एच. 44 पी. 5050) मधून सोलापूरहून बीडकडे येत होते. येरमाळा पास केल्यानंतर वाशी फाट्याजवळ सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या गाडीसमोर लाकडी दांडा घेऊन अज्ञात इसम आला. गाडीची स्पीड कमी होताच त्याने काचेवर लाकडी दांडा मारला. गाडी उभा राहिल्यानंतर आसपासच्या झाडात लपून बसलेल्या दोन्ही साईडकडून दहा ते पंधरा दहा ते पंधरा लोकांनी आपल्या हातातील लाकडी दांडे, काठ्या, लोखंडी सळ्या व अन्य शस्त्रांसह गाडीवर हल्ला सुरू ठेवला. बियरच्या रिकाम्या बाटल्या फेकून मारल्या. विशाल बडे यांना गाडीच्या खाली खेचत त्यांना मारहाण सुरू केली. या वेळी वर्षा बडे या मदतीसाठी आरडाओरड करत असताना दुचाकीवरुन जाणारे दोघेजण त्यांच्या मदतीसाठी धावले. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण सुरू केली. मात्र त्यातील एकाने मोठ्या शिताफीने वाशी पोलिसांना फोन केल्यानंतर वाशी पोलीस अवघ्या काही वेळात घटनास्थळी आले. त्यावेळी हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते मात्र तोपर्यंत त्यांनी बडे यांच्या खिशातील नगदी सहा हजार रुपये वर्षा बडे यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांपेक्षा जास्त सोन्याचे दागिने ओरबाडून नेले होते. पोलिसांनी यातील बडे दाम्पत्यासह मदतीस आलेल्या जखमी अशोक भाळवणे यांना उपचारार्थ नजीकच्या दवाखान्यात दाखल केले.

वर्षा बडे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात वाशी पोलीस ठाण्यात कलम 395, 427, 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातील अशोक भाळवणे हे हल्लेखोरांना ओळखत होते. त्यामुळे हल्लेखोरांचे नाव निष्पन्न झाले असून त्यात लहु काळे, किरण पवार, राहुल पवार, अनिल शिंदे, अशोक शिंदे, नवनाथ पवार, कविता शिंदे, सोनाबाई काळे, आशाबाई काळे, उषा काळे, छाया शिंदे, दुर्गा पवार, चतुराबाई पवार, आशा बाई काळे (सर्व रा. बारलोन, पारधी पिढी) असे आहे. यातील 14 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा हल्ला दरोड्याच्या हेतूनेच केला की, अन्य काही वेगळा प्रकार आहे. याचा तपास वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खनाळ हे करत आहेत.

Tagged