प्रतिनिधी । मुंबई
दि.12 : बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का आला असून त्यांना तातडीने मुंबईच्या ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एबीपी माझाने दिलेल्या बातमीनुसार धनंजय मुंडे यांना सायंकाळी सहाच्या सुमारास हा धक्का बसला. त्यांना तातडीने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कसलाही धोका नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी कळवले आहे. दरम्यान या बातमीनंतर अनेक नेत्यांनी ब्रीच कँन्डी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे.