रेखाताई क्षीरसागर यांना साश्रूनयनाने अखेरचा निरोप

न्यूज ऑफ द डे बीड

राजुरी येथे अंत्यसंस्कार

बीड : आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांना त्यांच्या मूळगावी राजुरी येथे हजारोंच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.

सकाळी साडेनऊ वाजता बीड येथील काकूंच्या बंगल्यावरून त्यांची अंतिम यात्रा राजुरीच्या दिशेने निघाली. राजुरी येथे टाळ मृदंगाच्या जयघोषात ही अंत्ययात्रा 11 वाजता अंत्यसंस्काराच्या नियोजित ठिकाणी पोहोचली. या ठिकाणी ब्रम्हवृंदांच्या पावित्र मंत्रोच्चारात सर्व धार्मिक विधी करण्यात येऊन आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या पवित्र पार्थिवाला अग्निडाग दिला. यावेळी क्षीरसागर कुटुंबातील सर्व सदस्य यांच्यासह सर्व जवळचे नातेवाईक, कार्यकर्ते, याशिवाय पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके, आ. विनायक मेटे, बाळासाहेब अजबे, आ. संजय दौंड, प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, माजी आ. अमरसिंह पंडित, पृथ्वीराज साठे, सुनील धांडे, उषाताई मोराळे, कुंडलिक खांडे, अशोक डक, युधाजित पंडित, रमेश आडसकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,अशोक हिंगे,पप्पू कागदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, मा.आ.राजेंद्र जगताप, मा.आ. सय्यद सलीम,मा.आ. सुनील धांडे,मा.आ. उषाताई दराडे,माजी मंत्री सुरेश नवले, अक्षय मुंदडा, आदीसह हजारो सामान्य नागरिक उपस्थित होते.

Tagged