ट्रॅक्टरखाली चिरडून ५ वर्षीय बालकाचा मृत्यू

क्राईम धारूर न्यूज ऑफ द डे

धारूरमध्ये अरुंद रस्त्याचा बळी

धारूर : येथील बस डेपोच्या समोर केजहून माजलगावकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या टायरखाली येऊन शिवराज लक्ष्मण सुरवसे या ५ वर्षीय बालकाचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना अरुंद रस्त्यामुळे झालेली आहे. मागील चार वर्षात खामगाव -पंढरपूर या महामार्गाच्या धारूर घाट रस्त्यावरील अरुंद रस्त्यामुळे कित्येकांना जीव गमवावा लागला असला तरी अद्यापपर्यंत रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झालेला नसल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

येथील बस डेपोच्या समोरासमोर केजहून माजलगावकडे जाणाऱ्या दोन ट्रॉली जोडलेल्या ट्रॅक्टरखाली (क्र.एम.एच. 44 डी 1908) चिरडून शिवराज सुरवसे या बालकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर उचलून मृत बालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याठिकाणी लोकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी प्रयत्न केले.

अपघाताची मालिका सुरूच
चार वर्षांपूर्वी तयार झालेला हा महामार्ग येथील अत्यंत अवघड घाट वळणावर ११ किमी अरुंद ठेवण्यात आल्याने या ठिकाणी सतत अपघाताची मालिका घडत असते. वेळोवेळी निवेदने देऊन रस्ता रुंदीकरणाची मागणी करूनही रस्ता रुंदीकरणासह पूर्ण केला जात नसल्याने या अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Tagged