बायकोला भेटायला गेलेला जावाई सासरवाडीतून बेपत्ता!

केज क्राईम न्यूज ऑफ द डे

केज दि.13 ः माहेरी गेलेल्या बायकोला भेटण्यासाठी सासरवाडीला गेलेला जावाई बेपत्ता झाल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आशुतोष सुनील कोकाटे (वय 22 रा. खोडस ता.केज) हा 8 मे रविवारी पत्नी निकिता हिला भेटायला चिंचोली माळी येथे गेला होता. पत्नीला भेटल्यानंतर तो चिंचोली माळी येथे राहणार्‍या त्याच्या मावशीला भेटून गावाकडे जातो म्हणून गेला. मात्र तो चार दिवस झाले तरी घरी आला नाही. त्याचा मोबाईलही बंद आहे. म्हणून त्याच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला; तरी तो आढळून आला नाही. म्हणून 12 मे रोजी त्याच्या नातेवाईकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांना सांगितला. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली असून आशुतोष हा कोणाला आढळला किंवा त्याच्या बाबतीत माहिती उपलब्ध झाल्यास पोलीसांना माहिती देण्याचे आव्हान केले आहे.

Tagged