राम मंदिर

मला मंत्रीपदासाठी 42 वर्ष लागली, तुम्ही नशीबवान आहात – रावसाहेब दानवे

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र राजकारण

नवी दिल्ली- आपल्याला मंत्रीपदासाठी 42 वर्ष लागली, पण तुम्ही नशीबवान आहात असं म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नवनिर्वाचित मंत्री भागवत कराड आणि कपिल पाटील यांना मिश्कील टोला लगावला.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून संधी मिळालेल्या नारायण राणे narayan rane, कपिल पाटील kapil patil, भागवत कराड bhagwat karad आणि भारती पवार bharati pawar यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला. दिल्लीत आयोजित या कार्यक्रमात नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे उपस्थित होते. यावेळी बोलताना दानवे म्हणाले, आपण केंद्रात मंत्री झालात. आता हा अनुभव वेगळाच आहे. आपल्याला मंत्रीपदासाठी 42 वर्ष लागली. पण तुम्ही सहा महिन्यात काम केलं. नक्कीच तुम्ही माझ्यापेक्षा जास्त काम मंत्रिमंडळात कराल, असं रावसाहेब दानवे भागवत कराडांचा उल्लेख करत म्हणाले.

कपिल पाटीलदेखील मी नवीन आहे म्हणाले. तुम्ही सात वर्षात राज्यमंत्री झालात हे पण काही कमी नाही. मला 42 वर्ष लागली. तुमच्यासारखे नशीबवान लोक सापडणं कठीण आहे, असा मिश्कील टोला रावसाहेब दानवेंनी लगावला.

Tagged