महामार्ग पोलीस गेवराई येथे गणेश मुंडेंची नियुक्ती!

बीड दि. 4 : बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेतून धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग येथे महामार्ग पोलीस म्हणून सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे यांची बदली झाली होती. 3 डिसेंबर रोजी गणेश मुंडे (ganesh munde) यांची पुन्हा बीड जिल्ह्यात बदली झाली आहे. महामार्ग पोलीस गेवराई येथे त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. विनंतीवरून त्यांची बदली करण्यात आली आहे. या बदलीचे […]

Continue Reading

अंबाजोगाई शहरात दहा लाखांचा गुटखा पकडला!

–एसपींच्या विशेष पथकाचे प्रमुख बाळराजे दराडे यांची कारवाईबीड दि.3 : पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने अंबाजोगाई शहरात गुटख्याच्या गोदामावर मंगळवारी (दि.3) सायंकाळी सातच्या सुमारास धाड मारली. यावेळी 10 लाख 67 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. गणेश बिडवे, किरण रविंद्र शेटे अशी गुटखा व्यापार्‍यांची नावे आहेत. त्यांनी अंबाजोगाई शहरातील गणेश प्रोव्हिजनच्या गोदामात गुटख्याचा साठा करुन ठेवला […]

Continue Reading
DEVENDRA FADANVIS

गेवराईचे माजी आमदार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला!

बीड दि. 3 : गेवराई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार लक्ष्मण पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेले आहेत. लक्ष्मण पवार हे गेवराई विधानसभा मतदार संघातून दोन वेळा आमदार राहिलेले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून त्यांना उमेदवारी देऊनही पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवली. यामध्ये त्यांचा दारुण पराभव झाला तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे […]

Continue Reading

बस चालकाला बेदम मारहाण ; हृदय विकाराचा आला झटका

सिरसाळा दि.27 : वृद्ध प्रवाशाला बसमधून खाली ढकलल्याच्या कारणावरून काही तरुणांनी बस चालकाला बेदम मारहाण केली, या मारहाणीत चालकाला हृदय विकाराचा झटका आल्याने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. प्रकृती चिंताजनक असून मारहाण करणाऱ्या तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत. नागनाथ गित्ते असे बस चालकाचे नाव आहे. त्यांनी एका वृद्ध प्रवाशाला बसमधून खाली ढकलले, ज्यामुळे संतापलेल्या […]

Continue Reading
golibar

बीडचा होतोय बिहार ; जुन्या वादातून गोळीबार!

जुन्या गुन्ह्याची कुरापत काढून गोळीबार●भररस्त्यात घडला थरार बीड दि.17 : बीड जिल्ह्याची वाटचाल बिहारच्या दिशेने होत आहे असे अनेक गुन्हेगारी घटनांवरून चर्चेत येत असते.विधान सभा निवडणुकीचा तोंडावर बीड मधील खूण प्रकरण असो की जिल्ह्यात अनेक शहरात सापडलेले अवैध शस्त्र असो की माऱ्यामाऱ्या यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था यावर नेहमीच प्रश्न निर्माण झालेला आहे.या सर्व विदारक […]

Continue Reading

परळी शहरात पिस्टल पाठोपाठ तलवार जप्त!

सामाजिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह परळी दि.6 : निवडणूक जशी जशी जवळ येत आहे, तशी परळी शहरातील गुन्हेगारी वृत्ती तोंड वर काढत असून सलग दुसऱ्या दिवशी बेकायदेशीर विनापरवाना धारधार शस्त्र हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या 21 वर्षीय युवकास परळी शहर ठाण्याचे भास्कर केंद्रे यांनी ताब्यात घेऊन जेरबंद केले. सलग दोन दिवसात गावठी पिस्तूलनंतर आता धारधार शस्त्र शहरात […]

Continue Reading
prakash solanke

पुरूषोत्तमाच्या चरणी नारळ वाढवून आ. सोळंकेंच्या प्रचाराचा शुभारंभ

सोळंकेंच्या विजयासाठी महायुती, पुरूषोत्तमपुरी सर्कल सरसावले माजलगाव दि.5 : महायुतीचे उमेदवार आ. प्रकाश सोळंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी देशातील एकमेव असलेल्या भगवान पुरूषोत्तमाच्या चरणी नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी पुरूषोत्तमपुरी परिसरातील पंधरा ते वीस गावातील ग्रामस्थांनी आ. सोळंके यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे यांच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या सादोळा, किट्टीआडगाव […]

Continue Reading

जयदत्त क्षीरसागर यांची बीड विधानसभेतून माघार!

बीड दि. 4 : बीड विधानसभेतून मोठी बातमी समोर येत आहे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भरलेला अपक्ष उमेदवारी अर्ज आज मागे घेतला. बीड विधानसभेसाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर त्यांचे पुतणे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आणि दुसरे पुतणे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष तर संदीप क्षीरसागर यांनी शरद […]

Continue Reading
acb trap

धनत्रयोदशीला बीडमध्ये एसीबीने फटाका फोडला!

बीड दि.29 : मागील आठवड्यात एकाच दिवशी बीड एसीबीने चार लाचखोर पकडले होते. त्यानंतर आज मंगळवार, 29 ऑक्टोंबर रोजी धनत्रयोदशीला बीडमध्ये एसीबीने फटाका फोडला आहे. दोन हजाराची लाच घेताना एका तलाठ्यास रंगेहाथ पकडले आहे. (Beed acb trap news) बीड एसीबीच्या टीमकडून लाचखोर तलाठ्याच्या घराची झडती घेण्यात आली. बीड तालुक्यातील तळेगाव येथील तलाठी मदन लिंबाजी वनवे […]

Continue Reading