‘त्या’ नवविवाहितेची आत्महत्या नसून खूनच!

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी माजलगाव


आत्महत्येचा पतीने केला बनाव

बीड दि.17 : पाणी आणण्यासाठी गेलेल्या नवविवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना 7 ऑगस्ट रोजी सिरसाळा ठाणे हद्दीत समोर आली. मात्र माहेरच्या नातेवाईकांनी सुरवातीपासूनच हा घातपात असल्याचा आरोप केला होता. पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला त्यानंतर पोलिसांनी मनुष्यवधाचा व छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलीस कोठडीत असलेल्या पती, सासू, सासरा यांची कसून चौकशी केल्यानंतर पतीने इतरांच्या मदतीने विहिरीत ढकलून देत खून केल्याची कबुली दिली. प्रकरणाचा अधिक तपास सिरसाळा पोलीस करत आहेत.

माजलगाव तालुक्यातील उमरी येथील भीमराव लांडगे यांची मुलगी राणीचा (२१) विवाह तीन महिन्यापूर्वी सुकळी येथील गणेश राऊत याच्याशी सोबत झाला होता. ७ ऑगस्ट रोजी राणी या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या नंतर त्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही माहिती नातेवाईकांना कळताच नातेवाईकांना धक्का बसला आपल्या मुलीचा पाय घसरून मृत्यू झाला नसून तो सासरच्या लोकांनी घातपात केल्याचा आरोप मुलीचे वडील भीमराव लांडगे यांनी केला होता. शवविच्छेदन करुन 8 ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार केल्यानंतर माहेरच्या लोकांनी सिरसाळा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत सासरच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी सर्वसाधारण तक्रार दाखल करून घेतली. घटना घडून तीन दिवस झाले तरी पोलिसांनी सासरच्या लोकांवर गुन्हे दाखल केले नसल्याने सिरसाळा पोलीस सासरच्या लोकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप मुलीचे वडील भीमराव लांडगे, भाऊ रवी लांडगे यांनी करत सासरच्या लोकांची चौकशी करून सासरच्या लोकावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी लाऊन धरली. त्यानंतर सिरसाळा पोलीस ठाण्यात पती गणेश ज्योतीराम राऊत, सासू सुनीता ज्योतीराम राऊत, सासरा ज्योतीराम सोपान राऊत यांच्यावर मनुष्यवधाचा व छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलीस कोठडीत आरोपी पतीची चौकशी करण्यात आली. त्यावर पोलिसाचा संशय बळावल्याने त्याची आणखी कसून चौकशी केली. त्यावर आरोपी पतीने इतरांच्या मदतीने पत्नी राणीला विहिरीत ढकलून देत खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी खुनाचे कलम वाढवण्यात आले असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेळके करत आहे.

Tagged