mobile chor, mobile chori

उत्तम दगडोबा गडम यांना माजलगावात मारहाण करून भरदिवसा लुटले

क्राईम माजलगाव

वैजेनाथ घायतिडक । माजलगाव
दि.6 : माजलगावचे प्रसिध्द व्यापारी उत्तम दगडोबा गडम यांना भुलथाप मारून शहराच्या मध्यवस्तीतून गाडीवर बसवत नदीकिनारी घेऊन येत मारहाण करीत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याची घटना माजलगाव शहरात सकाळी 10 च्या सुमारास घडली. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.
उत्तम दगडोबा गडम हे माजलगावातील कपडा व्यापारी आहेत. ते आज नेहमीप्रमाणे माजलगावच्या हनुमान चौकातील मारोती मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन बाहेर येताच त्यांना दोघा दुचाकीस्वारांनी जवळ बोलावले. आम्हाला मंगलनाथ मंदिराला देणगी द्यायची आहे, ती कुणाकडे द्यावी लागेल, आम्हाला मदत करा, असे म्हणत त्यांच्याकडे विचारपूस केली. शिवाय त्यांना गाडीवर बसण्याची विनंती केली. गडम हेही त्यांच्या बहकाव्यात आले. त्यांनी त्यांच्यासोबत गाडीवर बसून मंगलनाथ मंदिराचा रस्ता पकडला. मंदिराच्या जवळ आल्यानंतर या लुटारूंनी दुचाकी मंगलनाथ मंदिराकडे न नेता ती कदम यांच्या देवीच्या मंदिराकडे नेली. या ठिकाणी आधीपासूनच दोघेजण बसलेले होते. त्यांनी गडम यांना खाली उतरवून मारहाण करीत त्यांच्या अंगावरील 90 ग्राम सोन्याचे दागिने काढून घेतले.
घटनेनंतर गडम यांनी माजलगाव शहर ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू असल्याचे समजते.

Tagged