vilas bade voice of media

विलास बडे यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राज्याध्यक्षपदी नियुक्ती

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राज्याध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान
टेलिव्हिजन पत्रकार विभागाची जबाबदारी बडे यांच्यावर
प्रतिनिधी । मुंबई
दि.2 : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ voice of media या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या टेलिव्हिजन पत्रकारिता विभागाच्या महाराष्ट्र राज्यध्यक्षपदी, (महाराष्ट्र प्रदेशध्यक्षपदी) प्रसिध्द वृत्त निवेदक विलास बडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, राज्याध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते मुंबई येथे संघटनेच्या कार्यालयात देण्यात आले. नियुक्तीनंतर संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

विलास बडे यांच्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, आपली पत्रकारितेमधील उज्ज्वल कारकीर्द, काम पाहून आपली ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या टेलिव्हिजन पत्रकारिता विभाग महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी, (महाराष्ट्र प्रदेशध्यक्षपदी) आम्ही नियुक्ती करत आहोत. ही नियुक्ती करत असताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आम्हाला आशा आहे की, आपण खूप गतीने काम कराल. पत्रकारांच्या आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करणार आहोत. मूल्याधारित पत्रकारिता ही विचारधारा कायम राहावी. ज्या पत्रकारितेच्या जीवावर या सृष्टीचा डोलारा चालतो, ती पत्रकारिता शाबूत राहावी, सुरक्षित राहावी, यासाठीच आपण काम करणार आहोत. आपल्यावर दिलेली जबाबदारी आपण पार पाडाल, ही अपेक्षा आहे. आपण राज्याची 22 जणांची कार्यकारणी करावी. आपल्या कार्यक्षेत्रात असणार्या सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष नियुक्त करावे. आपण पुढील कामास गती द्यावी, असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

विलास बडे यांच्या नियुक्तीनंतर बोलताना राज्याध्यक्ष राजा माने म्हणाले, विलास बडे हे एक ग्रामीण भागातून पुढे आलेले पत्रकार आहेत. त्यामुळे त्यांना तळागाळातील पत्रकारांच्या समस्यांची पूर्ण जाण आहे. व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून ते निश्चितपणे हे प्रश्न मार्गी लावतील. संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल असे सांगितले.
बडे आता राज्यात आपली टीम उभी करणार आहेत.

 

संदीपजी काळे यांनी माझ्यावर ही मोठी जबाबदारी टाकलेली असून निश्चितच ही जबाबदारी आपण पूर्ण ताकदीने पार पाडू. पत्रकारांचे प्रश्न एकट्याने नव्हे तर समुहाची वज्रमूठ बांधल्यानंतर लवकर सुटतील, असा मला विश्वास आहे. व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारितेचा सकारात्मक विचार घेऊन वाटचाल करीत असल्याने मी ही जबाबदारी घेत आहे.

विलास बडे

राज्याध्यक्ष, व्हॉईस ऑफ मीडिया (टेलिव्हीजन)

विलास बडे हे एक चळवळीतील पत्रकार आहेत. व्हॉईस ऑफ मीडिया परिवारात ते सहभागी झाल्याने पत्रकारांच्या मुल्याधारित विचारधारेला आणखी बळ मिळाले आहे.

  • संदीप काळे
    संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया
Tagged