वैद्यनाथ साखर कारखाना निवडणूक; मुंडे बहिण-भाऊ एकत्र येणार?

न्यूज ऑफ द डे परळी बीड

२१ जागांसाठी ५० उमेदवारी अर्ज दाखल

परळी : तालुक्यातील पांगरी (गोपीनाथगड) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीत कारखान्याच्या चेअरमन, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि त्यांचे चुलत बंधू आमदार धनंजय मुंडे हे एकत्र येण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (दि.१६) २१ जागांसाठी ५० अर्ज दाखल झाले आहेत.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पंकजाताई मुंडे यांचा अर्ज दाखल झाला आहे. कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा आमदार धनंजय मुंडे व चेअरमन पंकजाताई मुंडे आमने-सामने येणार अशा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. पण आ.धनंजय मुंडे यांचा अर्जच दाखल झाला नसल्याने निवडणुकीतील अटीतटीची लढत होणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. आज (दि.१७) अर्जाची छाननी होणार आहे. तर दि.१८ मे ते १ जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. आणि ११ जून रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, सध्या २१ जागेसाठी ५० अर्ज दाखल झाले असले तरीही वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा होत आहे.

Tagged