ATYACHAR

अल्पवयीन मुलीला घेवून भोंदूबाबाने ठोकली धूम!

केज क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि.23 : आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यासाठी येणार्‍या भोंदू बाबाने त्याच कुटूंबातील एका 15 वर्षीय मुलीसोबत आपले सुत जुळवले. त्यानंतर तिला घेवून धूम ठोकल्याची घटना 18 मे रोजी केज तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी भोंदूबाबा विरोधात युसूफवडगाव पोलीसात गुुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धोंडीराम भोसले महाराज ऊर्फ माऊली (वय रा.मगरवाडी, ता. अंबाजोगाई) असे या भोंदू बाबाचे नाव आहे. केज तालुक्यातील युसूफवडगाव ठाणे हद्दीतील एका गावातील इसमावर रुग्णालयात उपचार करुनही फरक पडत नव्हता. त्यामुळे नातेवाईकांच्या सांगण्यावरून धोंडीराम भोसले महाराज यांच्याशी संपर्क साधला. या बाबाने आपण आयुर्वेदिक पद्धतीने यावर उपचार करून तुमचा आजार लवकरच बरे करतो, असे आश्वासन देऊन उपचार सुरू केले होते. नित्यनेमाने दररोज महाराज या इसमावर उपचार करण्यासाठी चारचाकी वाहनातून यायचा. तब्बल एक वर्ष उपचार केल्यानंतर हा बाबा उपचार करण्यासाठी घरी आला आणि या कुटुंबातील घरामागील हातपंपावरून पाणी आणण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला घेवून त्याने धूम ठोकली. अनेक ठिकाणी शोध घेवून देखील मुलगी सापडत नसल्याने अखेर कुटुंबातील सदस्यांनी पोलीसात धाव घेत गुन्हा दाखल केला.

Tagged