राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) बीड जिल्हाध्यक्षपदी आमदार संदीप क्षीरसागर

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले नियुक्तीपत्र

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदावरून राजेश्वर चव्हाण यांना मंगळवारी बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर आता बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

अंबाजोगाईचे राजेश्वर चव्हाण हे जिल्हाध्यक्ष पदावर असताना त्यांनी अजित पवार गटाचे समर्थक आमदार तथा मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिंबा दर्शविला. ही कृती पक्षविरोधी असल्याचे सांगत त्यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून बीड जिल्हाध्यक्षपदी आमदार संदीप क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीपत्र देताना माजी मंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेबूब शेख, डॉ. बाबुराव जोगदंड आदींची उपस्थिती होती.

Tagged