मराठा आंदोलन सामान्यांनी हातात घेतले यात फूट पाडायची देशात कोणाची हिंमत नाही

बीड

मनोज जरांगे पाटील : लाखोच्या संख्येने सकल मराठा समाज बांधवांची माजलगावात उपस्थिती

वैजनाथ घायतिडक – माजलगाव दि. 2 : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठी चार्ज केला. आणि राज्यातला मराठा एक वाटला मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता स्वस्त बसायचं नाही हे आंदोलन आता सर्वसामान्यांनी हातात घेतले यात फूट पाडण्याची देशात कोणाची हिम्मत नाही. आसे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी माजलगाव येथे सोमवार रोजी सायंकाळी ९ वाजता शिवप्रताप मंगलकार्यालयात घेतलेल्या सकल मराठा समाज बांधवांच्या महासभेप्रसंगी केले. यावेळी माजलगाव तालुक्यातील लाखोच्या संख्येने सकल मराठा समाज बांधव उपस्थित होता.

राज्य सरकारने सर्व पक्षीय बैठकीमध्ये टिकणारं आरक्षण देतो तुम्ही वेळ द्या असा ठराव पारित केला आणि तो ठराव माझ्याकडे घेऊन आले आपण जर सरकारला वेळ दिला नसता तर उद्या त्यांनी दिलेले आरक्षण टिकलं नसतं आणि याचं सगळं खापर राज्य सरकारने मराठा समाजाच्या माथ्यावर मारला असता त्यामुळे सत्तर वर्षात कधी नाही ते सर्व पक्षीय बैठकीत टिकणारं आरक्षण देण्याचा ठराव त्यांनी घेतला आणि यामुळेच आपण सरकारला एक महिन्याचा काय आणखीन दहा दिवस वाढवून दिले आता ४० दिवस पूर्ण झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे कारण मराठा समाज मागास सिद्ध झाल्याचा गायकवाड कमिशनने अहवाल दिलेला आहे. मराठा समाज मागास सिद्ध झाला आहे तर मराठ्याची पोट जात ही कुणबी आहे आणि कुणबी हा ओबीसी मध्ये येतो त्यामुळे मराठा सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायला सरकारला कोणतीही अडचण नाही सगळ्यांना मी सांगू इच्छितो की यापुढे आंदोलन करताना उद्रेक, जाळपोळ करायचा नाही. आणि कुणीही आपला जीव द्यायचा नाही तुम्ही जर जीव दिला तर आरक्षण घेऊन करायचं काय कोणासाठी करायचं त्यामुळे इथून पुढे होणारे सर्व आंदोलन हे शांततेच्या मार्गाने करायचे. हे त्याच 14 ऑक्टोंबर रोजी राज्य सरकारने दिलेल्या वेळेला एक महिना पूर्ण होत आहे यामुळे हे त्या १४ ऑक्टोबर रोजी आपण सर्व समाज बांधवांनी आंतरवली सराटी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे जेवढे आपण त्या ठिकाणी उपस्थिती राहाल ती उपस्थिती पाहूनच सरकारला घाम फुटेल व आपल्याला आरक्षण देण्यास त्यांना भाग पडेल यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने अंतरवाली सराटी येथे उपस्थित राहावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी माजलगाव येथे घेतलेल्या सकल मराठा समाजाच्या महासभे प्रसंगी केले. यावेळी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांची लाखोच्या संख्येने उपस्थिती.

सोपासेट असतानाही स्टेजवरच खाली
बसणे मनोज जरांगे पाटलांनी पसंद केले

सोमवारी शिवप्रताप मंगल कार्यालय येथे सकल मराठा समाज बांधवांच्या महासभेचे आयोजन केले होते यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे जेसीबीच्या साह्याने त्यांचे हार घालून स्वागत केले. स्टेजवर त्यांना बसण्यासाठी सोपासेट ची व्यवस्था केली असतानाही ती स्टेजवरच त्यांनी खाली बसने पसंद केले मनोज जरांगे पाटील खाली बसताच टाळ्यांचा कडकडाट झाला त्यांनी हात जोडून समाज बांधवांना अभिवादन केले.

तीन तास उशिरा महासभा
तरी लाखोंची उपस्थिती

मनोज जरांगे पाटील यांची महासभा सायंकाळी सात वाजता नियोजित ठरली होती परंतु त्यांना येण्यासाठी दहा वाजले तरीही सकल मराठा समाज बांधवांची लाखोंची उपस्थिती तिन तास उशीर झाला तरी दिसून आली.

यांची महसभेसाठी झाली मदत
मंगल कार्यालय – प्रताप रांजवण पाटील
खिचडी वाटप – मराठा समाज किराणा असोसिएशन माजलगाव,
५००० पाणी बॉटल – भालचंद्र कोकाटे सुंदरम टेक्सटाईल,
साऊंड सिस्टिम – दिलीपराव सोळंके,महेश ठोंबरे,रामराजे रांजवण ,आमोल सरवदे, अंकुशराव शिंदे
डिजिटल स्क्रीन व कॅमेरा व्हिडिओ शूटिंग- दिनकर डाके
दोन क्विंटल फुले, हार जेसीबी- मनोज जगताप, सतिश सोळंके तर मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आलेल्या सर्वांची भोजन व्यवस्था ईश्वर होके यांनी केली होती.

Tagged