beed-dukan

खव्यातून 6 जणांना विषबाधा

बीड

बीड : खव्यातून सहा जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार बीडमध्ये बलभीम चौकातील नालबंद गल्लीत सकाळी उघडकीस आला आहे. खव्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर अचानक उलटी, जुलाब सुरू झाल्याने सहा जणांना तातडीने नाळवंडी रोडवरील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

      गौस खान गुलाब खान, जाकेरा गौस खान, सालेहा पठाण, सिद्दीखा पठाण, अरसलान पठाण, सीजा पठाण असे दवाखान्यात दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे असून शहरातील मोमीनपुरा भागातील रहिवासी आहेत. यातील इमरान खान गौस खान यांनी पांगरी रोडवरील संतोषीमाता चित्रपट गृहासमोरील ओम खवा व पेढा सेंटर येथून खवा खरेदी केला होता. घरी आल्यानंतर त्या खव्याचे पदार्थ बनवून खाताच कुटुंबियांतील सदस्यांना उलटी, मळमळ, जुलाबचा त्रास होवुन अस्वस्थ वाटु लागले. या सर्वांना नाळवंडी रोडवरील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान यासंदर्भात खवा विक्रेत्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सदरील प्रकाराची माहिती अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी अनिकेत भिसे, एच.आर.मरेवार आणि नमुना सप्लायर शेख मुख्तार यांनी तातडीने दुकानात येवुन खव्याचे सॅम्पल घेतले आणि दुकान सील केले.

Tagged