लाडेवडगाव परिसरात तरुणाचा खून

केज क्राईम न्यूज ऑफ द डे मराठवाडा

अनैतिक संबधातून खूनाचा संशय

आडस  : केज तालुक्यातील लाडेवडगाव परिसरात एक मृतदेह आढळून आला. त्याचा खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदज पोलीसांनी वर्तवला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
बाबासाहेब चंद्रभान लाड (वय 39) असे मयताचे नाव आहे. अंबाजोगाई रोडवरील लाडेवडगाव परिसरात शनिवारी (दि.18) सकाळी मृतदेह आढळून आला. यावेळी मयताच्या अंगावर जखमा आढळून आल्या. अनैतिक संबधातून हा खून झाला असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि.आनंद झोटे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुुरु आहे.

Tagged