rummy, tirat, jugar

सात जुगारी अटकेत

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

नेकनूर : कोरोनासारख्या महामारीला रोखण्यासाठी देशासह जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही काही जण नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे अवैध धंदे चालवित आहेत. काल नेकनूर हद्दीतील एका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने धाड टाकत 56 हजार 850 रुपयांच्या मुद्देमालासह सात आरोपी ताब्यात घेतले. ही कारवाई पथकप्रमुख सपोनि. आनंद कांगुणे व त्यांच्या टिमने केली.

या बातमीच्या जेपीजी इमेजसाठी इथे क्लिक करा

जमावबंदी व संचारबंदी काळात बीड जिल्ह्यामधील अवैध धंद्यांची माहिती काढून त्यांच्यावर केसेस करण्याचे व अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. काल पथकप्रमुख आनंद कांगुणे यांना नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी प्रदीप मशिनरी स्टोअर्सच्या बाजुला नांदूरफाटा (ता. बीड) येथे विकास गुलाब कोल्हे हा मोकळ्या जागेत काही इसमांना घेऊन तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवताना आढळून आला. या जुगार्यांमध्ये विकास गुलाब कोल्हे (वय 28, रा. पांढर्‍याची वाडी ता. बीड), रविंद्र ज्ञानोबा भोसले (वय 39, रा. खर्डेवाडी), रुपेश दत्तात्रय भोसले (रा. खर्डेवाडी), दिगांबर उत्तम भोसले (बुरंडवाडी ता. केज), बापू विठ्ठल भोसले (विडा ता. केज), उत्तरेश्वर अच्यूत भोसले (रा. बुरंडवाडी), बाबुराव एकनाथ केंगर (वय 30, रा. खर्डेवाडी) यांना ताब्यात घेतले असून या वेळी रोख रक्कम 25 हजार 850 रुपये व 31 हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल, असा एकूण 56 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील सातही आरोपींच्या विरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात कलम 12 (अ) सह कलम 188, 269, 270 भा.दं.वि. सह कलम 51 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि. आनंद कांगुणे, पो.ना. झुंबर गर्जे, पो.ना. गहिनीनाथ गर्जे, पो.शि. गोविंद काळे, अन्वर शेख यांनी केली.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.